Back to Top

" कृषिसमृद्धी " समन्वयीत कृषी विकास प्रकल्प ( C A I M )
कृषिसमृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पा विषयी माहिती

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या सहा जिल्हयांमध्ये कृषि क्षेत्रात शासनामार्फत सध्या राबविण्यात येत असलेल्या सर्व योजनांमध्ये समन्वय साधून कृषि विकास साधण्याकरीता महाराष्ट्र शासन पुरस्कृत, आंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी (IFAD) व सर रतन टाटा ट्रस्ट (SRTT) सहाय्यीत कृषीसमृध्दी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प (CAIM) राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्प वर्ष 2018 पर्यंत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सहा जिल्हयातील निवडक 1606 गावांमधिल सुमारे 2,86,000 लाभार्थी कुटूंबांना लाभ देवून कृषि विकास साधला जात आहे.

कृषिसमृद्धी प्रकल्प एक महत्वाकांक्षी प्रकल्प असुन CM , PM पॅकेजचा दुसरा टप्पा किंवा त्या प्रकल्पाचा दुसरा भाग आहे असे म्हटले तर वावगं होणार नाही . CM , PM पॅकेजद्वारे विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये नैराश्यग्रस्त कुटुंबांचा सर्वांगीण विकास करणे हेतु शेतीविकास , शेतीपूरक व्यवसाय , उत्पन्नवाढ कार्यक्रम आणि शाश्वत उपजिविका इ . मुख्य उपदेशांची पुर्तीसाठी राबविला गेला तर कृषिसमृद्धी हा प्रकल्प लोकसहभातून प्रत्यक्ष लाभार्थी कुटुंबाची शेतीसुधारणा पासुन बाजारपेठ व्यवस्थापन व शाश्वत उत्पन्नवाढ करून शेतकऱ्यांना नैराश्यातुन बाहेर काढणे तसेच जोखमींनी तोंड देण्याची क्षमता निर्माण करून सुस्थितीत पुनर्स्थापित करणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे .

प्रकल्प कशासाठी


शेतकरी व शेतमजुरांचे जीवनमान उंचावणे. मुद व जलसंधारण करता --- शेततळे , नदी , नाले , यावर बांध बंधिस्ती , शेत बांध बंधिस्ती , माती नाला बांध, सिमेंट नाला बांध , गावपातळीवर लोकसहभागातून /गटातून अंमलबजावणी. शेती-कमी खर्चाचे शेतीतंत्र , सेंद्रिय शेती पद्धतीचा प्रसार , नवीन पिकांचा समावेश , शेतकरी गटाचे , समुहाद्वारे व फील्ड फ्रेश , आरंभ ऍग्रो सोबत बेबीकॉर्न खरेदीसाठी करार . शेतीपुरक जोडधंदे - दुग्ध व्यवसाय ,कृषी मालावर प्रक्रिया व कृषी मालाची समुहाद्वारे विक्री कुक्कुटपालन शेतमाल प्रक्रिया उद्योगाची , उभारणी , मधुमक्षिका पालन , मत्स्य पालन इ . महिला सक्षमीकरण व समुहसंघटन - गाव विकास समिती , संयुक्त दायित्व गट , महिला शेतकरी गट इत्यादींचे द्वारे सामुहिक प्रयत्नांद्वारे आर्थिक उपक्रम व त्याद्वारे उत्पादक कंपनीची स्थापना.

प्रकल्पाचा मुख्य उद्देश


या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे घटलेले कृषि उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान देऊन, प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा, शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पनांच्या स्त्रोतांसह, कृषी व कृषियेत्तर उत्पनांच्या साधनांद्वारे विकास करणे. त्याचप्रमाणे उत्पादनातील व बाजारपेठीय जोखीमीमुळे दारिद्रय वा नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटूंबांना सुस्थितीत पुनर्स्थापीत करणे होय.

प्रकल्पाची उद्दिष्टये


1. वैविध्यपूर्ण शेती आणि कृषियेत्तर उत्पनांच्या साधनांद्वारे कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ करणे.
2. सेंद्रिय शेती व किमान निविष्ठांची कंत्राटी शेती पध्दती अवलंबून कृषि विकास करणे.
3. कृषि उत्पादनांची प्राथमिक प्रक्रिया, त्यांची गुणवत्तावाढ आणि मालाची विक्री व्यवस्था इ. बाबतीत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे.
4. सुक्ष्म-वित्तपुरवठा (Micro-Finance) आणि अतिलघु-उद्योगांद्वारे महिला सक्षमीकरण.
5. शासनाचे सर्व स्त्रोत आणि योजनांमध्ये समन्वय साधणे.

प्रकल्पाचे लाभार्थी


प्रकल्प श्रेत्रातील एका तालुक्या मधील २० ते २५ गावांचे एक क्लस्टर या प्रमाणे ६४ क्लस्टर मधील एकूण सुमारे ३ लाख कुटुंबाना व सुमारे २० लाख लोकांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे . प्रकल्पातील प्रत्येक गावातील कुटूंबांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. प्रकल्पातील लाभार्थी प्रामुख्याने खालीलप्रमाणे आहेत.
* दारिद्रय रेषेखालील कुटूंब.
* अनूसुचित जाती, जमाती.
* अल्प व अत्यल्प भुधारक व भूमिहीन कुटूंब.
* ग्रामिण महिला.
* नैराश्यग्रस्त शेतकरी हे प्रमुख लाभार्थी असतील.

प्रकल्पाचे प्रमुख घटक


1. विविध खाजगी, सेवाभावी व शासकीय संस्थांमध्ये भागिदारी निर्मीती व या संस्थांचा क्षमता विकास- महिलांचे सक्षमीकरण (SHG & CMRC)
2. उत्पादनापासून पणन व्यवस्थेपर्यंत बाजार जाळयांद्वारे (Market Linkage) समन्वय साधणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे:
* शाश्वत शेती
* मुळ-स्थळी जलसंधारण
* बाजार जाळयांची निर्मीती व शेती आधारित अतिलघु आणि लहान व मध्यम प्रकल्प / उद्योगांची उभारणी
* पशु संवर्धन
3. प्रकल्प व्यवस्थापन

महत्वाच्या व्यक्ती

  • मा. श्री दिनेशकुमार जैन
    मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन

  • मा. श्री अनुप कुमार ,भाप्रसे
    अतिरिक्त, मुख्य सचिव
    कृषी व पणन, महाराष्ट्र शासन, मुंबई

यशोगाथा


John

झेंडू फुल शेती

घटलेले कृषी उत्पन्न वाढवण्याच्या प्रयन्तांमध्ये योगदान देऊन , प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा , शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पानांचा स्रोतांसह कृषी व कृषियेतर साधनांद्वारे विकास करणे. त्याच प्रमाणे उत्पादनातील व बाजारपेथीय जोखमामुळं द्रारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे होय.

John

औषधी वनस्पती

घटलेले कृषी उत्पन्न वाढवण्याच्या प्रयन्तांमध्ये योगदान देऊन , प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा , शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पानांचा स्रोतांसह कृषी व कृषियेतर साधनांद्वारे विकास करणे. त्याच प्रमाणे उत्पादनातील व बाजारपेथीय जोखमामुळं द्रारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे होय.

John

दूध डेअरी

घटलेले कृषी उत्पन्न वाढवण्याच्या प्रयन्तांमध्ये योगदान देऊन , प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा , शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पानांचा स्रोतांसह कृषी व कृषियेतर साधनांद्वारे विकास करणे. त्याच प्रमाणे उत्पादनातील व बाजारपेथीय जोखमामुळं द्रारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे होय.

John

मत्स्य व्यवसाय

घटलेले कृषी उत्पन्न वाढवण्याच्या प्रयन्तांमध्ये योगदान देऊन , प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा , शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पानांचा स्रोतांसह कृषी व कृषियेतर साधनांद्वारे विकास करणे. त्याच प्रमाणे उत्पादनातील व बाजारपेथीय जोखमामुळं द्रारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे होय.विविध उपक्रम


उपक्रमांची व्याप्ती


एकूण जिले


6

एकूण तालुकेएकूण गावे


1606


एकूण कुटुंब संख्या


2,86,800

एकूण समूह ( २० ते २५ गावे )


64आमचे आर्थिक सहाय्यकार


John
John

कृषिसमृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्प